Panjab Dakh Andaj : मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. लाखो हेक्टरवरील पिकं उध्वस्त झाली, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, उडीद, कापूस आणि द्राक्षं या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असताना आता शेतकऱ्यांसाठी पंजाब डक (Panjab Dakh) यांचा दिलासादायक अंदाज समोर आला आहे.
पाऊस कधी जाणार? सोयाबीन कधी काढावी?
पंजाब डक यांच्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर कोरडे हवामान आणि ऊन राहील. मात्र 1 ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होईल. सुरुवात यवतमाळ, नांदेड, बिलोली आणि चंद्रपूरपासून होईल, त्यानंतर पाऊस मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईपर्यंत पसरू शकतो. अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे. लातूर, बीड, जालना, नांदेड, परभणी, बुलढाणा, नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्त राहू शकते, असेही पंजाब डक यांनी स्पष्ट केले आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो, तयारीला लागा! सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता, ही आहेत 3 मोठी कारणे..
सोयाबीन कधी काढता येईल?
8 ऑक्टोबरपासून राज्यभर सूर्यदर्शन सुरू होऊन पावसाला निरोप मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांची काढणी करावी. अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर हा कालावधी कोरडा राहणार असल्याने काही भागात लवकर काढणी सुरू करता येईल, असेही ते म्हणाले.
पाऊस जाणार हे कसे ओळखावे?
औंडा आणि पूर्णा तालुक्यात जाळेधुई दिसली आहे. पारंपरिक समजुतीनुसार, जाळेधुई दिसल्यानंतर साधारण 12 दिवसांनी पाऊस कमी होतो. त्यामुळे याही वेळेस 8 ऑक्टोबरनंतर पावसाळा संपण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे.
येथे वाचा – महिलांना फक्तं अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर; पहा कागदपत्रे व अर्ज कुठे करावा?
आता शेवटचा पाऊस
4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणारा पाऊस हा हंगामातील शेवटचा पाऊस ठरेल. त्यानंतर 8 तारखेपासून ऊन पडेल. यामुळे खरीप पिकं, द्राक्षबाग आणि रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे.
येथे वाचा – कांद्याचे दर वाढले; या बाजारात 100 रुपयांनी वाढ, पहा आजचे सर्व कांदा बाजार भाव..!