काय? महिलांना फक्तं अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर; पहा कागदपत्रे व अर्ज कुठे करावा?

Tractor Scheme : सरकार महिलांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना (Government Scheme) राबवत आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे, त्यासोबतच महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सूट दिल्याने त्यांचा दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी झाला आहे. याशिवाय, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Connection) मिळाल्याने महिलांचे आरोग्य आणि घरातील स्वच्छता सुधारली आहे. या योजनांमुळे महिलांवर येणारा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता महिला अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. कुठे अर्ज करावा आणि कागदपत्रे कोणती लागतात? चला जाणून घेऊया..

महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार सतत नवे उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM) योजनेअंतर्गत महिलांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल 50 टक्के अनुदान (subsidy) दिले जात आहे. म्हणजेच, महिलांना आता ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत मिळू शकतो. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळाल्याने महिलांची मेहनत कमी होईल आणि उत्पादन देखील वाढेल. त्यामुळे ही योजना महिलांना केवळ आर्थिक मदतच करत नाही, तर शेतीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांना खऱ्या अर्थाने सशक्त बनवते. काय आहे या योजनेची संपूर्ण माहिती, जाणून घेऊया सविस्तर…

केंद्र सरकारतर्फे कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ही महत्त्वाची योजना राबवली जाते. या योजनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री कमी किमतीत उपलब्ध करून देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे, या योजनेत महिलांना अतिरिक्त लाभ देण्यावर विशेष भर दिला जातो.

येथे वाचा – यंदा पांढरं सोनं मालामाल करणार? कापसाचे भाव वाढणार का?

या योजनेत केंद्र सरकारकडून 90 टक्के तर राज्य सरकारकडून 10 टक्के एवढा निधी दिला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या महिला शेतकऱ्याने 4.5 लाखांचा ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार केला, तर त्याची किंमत 4 लाख 50 हजार रुपये असेल. तर यावर 50 टक्के सबसिडी मिळाल्यामुळे शेतकरी केवळ 2 लाख 25 हजार रुपये भरेल, तर उरलेली अर्धी रक्कम सरकारच्या वतीने दिली जाईल. म्हणजेच महिलांना ट्रॅक्टर खरेदी करताना फक्त अर्धा खर्च करावा लागतो.

जर हाच ट्रॅक्टर एखाद्या सामान्य शेतकऱ्याने घेतला, तर त्याला 4.5 लाखांच्या ट्रॅक्टरवर केवळ 40 टक्के सबसिडी मिळेल. त्यामुळे त्याला सुमारे 2 लाख 70 हजार रुपये स्वतःच्या खिशातून द्यावे लागतील. त्यामुळे पुरुष शेतकऱ्यांच्या तुलनेत महिला शेतकऱ्यांना सुमारे 45 हजार रुपयांची जास्त सूट मिळते. त्यामुळे ही योजना महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

(1) आधार कार्ड, (2) बँक पासबुकची प्रत, (3) जमीन नोंदी (खसरा/खतौनी), (4) पासपोर्ट आकाराचा फोटो, (5) उत्पन्न आणि जातीचा दाखला (गरज असेल तर), (6) महिला शेतकरी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड किंवा शेतकरी नोंदणी)

अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम अधिकृत पोर्टल https://agrimachinery.nic.in किंवा https://myscheme.gov.in ला भेट द्यावी. पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सादर करा. ही प्रक्रिया सोपी असून, ऑनलाइन अर्ज केल्याने महिलांना त्यांच्या ट्रॅक्टरसाठी ५० टक्के अनुदान मिळविण्यात मदत होईल.

Leave a Comment